वैजयंती बेलसरे - लेख सूची

मनाची संकल्पना आणि गिल्बर्ट राईल

गिल्बर्ट राईल (1900-76) हे एक ब्रिटिश विश्लेषणवादी तत्त्वचिंतक. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञानाच्या अध्यापनाचे कार्य केले. ‘Mind’ या जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानाशी निगडित जर्नलचे संपादक जी.ई.मूर या विश्लेषणवादी तत्त्वचिंतकानंतर त्यांनी भूषविले. तत्त्वज्ञानावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. विशेषतः 1949 साली त्यांनी लिहिलेल्या ‘Concept of Mind’ या पुस्तकामुळे त्यांचे नाव आणि विचार चर्चेत आले. साधारणपणे 1950-60 या दशकात ब्रिटिश तत्त्वज्ञानावर …